Diwali : तेलदीप पणत्यांसह सारे ज्ञानदीप लावूया ।
विश्वात्मक सनातन भारतीय संस्कृती ।
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हीच खरी ज्योती ।
अज्ञान अंधार नष्ट करण्या ज्ञानदीप लावूया ।
तेलदीप पणत्यासह सारे ज्ञानदीप लावूया ॥ १ ॥
नरकचतुर्दशीचा अर्थ घ्या समजून ।
भगवान श्रीकृष्णाचा पराक्रम घ्या जाणून ।
नीच, दुष्ट, अधर्म असा जिवंत नरकासुर मारा ।
नका जाळू कागद पुठ्ठ्याच्या खोट्या नरकासुरा ॥ २ ॥
समाजातील अधम अधर्मी जन ।
अशा नरकासुरा टाका ठेचून ।
भगवान श्रीकृष्णाचे करा पूजन ।
करा जयजयकार मिरवणूक काढून ॥ ३ ॥
सनातन हिंदु धर्म हा ईश्वर निर्मित ।
सनातन संस्कृती जगा नियमित ।
जगुनी जागवा अथक सुनिश्चित ।
दीपावली ज्ञानदिपांची करू साजरी अखंडित ॥ ४ ॥
अज्ञान अंधार नष्ट करण्या ज्ञानदीप लावूया ।
तेलदीप पणत्यांसह सारे ज्ञानदीप लावूया ॥
– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (३.११.२०२३)