अभिनेता शिझान खान याच्यावरील गुन्हा रहित करण्यास न्यायालयाचा नकार !
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण
मुंबई – अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी गुन्हा रहित करण्यासाठी अभिनेता शिझान खान याने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर या दिवशी फेटाळली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.
‘अली बाबा : दास्तान-ए-काबुल’ या मालिकेचे वसई येथे चित्रीकरण चालू असतांना तुनिषा शर्मा हिने २४ डिसेंबर २०२२ या दिवशी आत्महत्या केली होती. या प्रकरणी तुनिषा शर्मा हिचा प्रियकर आणि सहकलाकार शिझान खान याला अटक करण्यात आली होती. शिझान खान सध्या जामिनावर मुक्त आहे.