आंबिवली (जिल्हा ठाणे) येथे आरोपीला नेणार्या पोलिसांवर इराणी जमावाचे आक्रमण !
- दगडफेक करून दांडक्यांनी आक्रमण
- १० पोलीस घायाळ
ठाणे, १० नोव्हेंबर (वार्ता.) – आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या इराणी वस्तीत आरोपींच्या शोधात अंधेरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे एक पथक गेले होते. ३ आरोपींना पकडून नेतांना तेथील महिला आणि पुरुष यांच्या हिंसक जमावाने अचानक पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. दांडक्यांनी आक्रमण केले. (अशा उपद्रवी विदेशी गुंडांना सरकार देशातून हाकलून का देत नाही ? – संपादक) या आक्रमणात १० पोलीस कर्मचारी घायाळ झाले आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात इराणी वस्तीतील १७ आक्रमणकर्ते आणि त्यांच्या १५ अनोळखी साथीदारांवर विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
मुंबई येथील चोरीच्या प्रकरणात हसन अजीज इराणी आणि जाफरी युनिस इराणी उपाख्य बड्डा आणि अन्य २ आरोपींचा शोध घेत असतांनाच ही घटना घडली.
संपादकीय भूमिका :
|