Pakitan Terrorist Killed : पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात आतंकवादी कारवाया करणार्‍या आणखी एका आतंकवाद्याची पाकमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उपाख्य अक्रम गाझी असे त्याचे नाव आहे. पाकच्या बाजौर भागात अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. अक्रम सातत्याने भारतविरोधी गरळओक करत होता. वर्ष २०१८ ते २०२० या काळात तो लष्कर-ए-तोयबामध्ये मुसलमान तरुणांना भरती करण्याचे काम करत होता.