Robot kills worker in South Korea : दक्षिण कोरियात ‘सेंसर’ नादुरुस्त झाल्याने एका रोबोटने एका कर्मचार्याला जखडून केले ठार !
सेऊल (दक्षिण कोरिया) – येथील ग्योंगसांग प्रांतात एका कृषी वितरण केंद्रात काम करणार्या एका कर्मचार्याची एका रोबोटने हत्या केली. हा रोबोट मिर्चीने भरलेली खोकी एका ठिकाणातून दुसर्या ठिकाणी ठेवत होता. त्याचा सेंसर नादुरुस्त झाल्याने त्याला तेथे काम करणारा ४० वर्षीय कर्मचारीही खोकाच वाटला. त्यामुळे त्याने त्या कर्मचार्याला एवढ्या जोरात जखडले की, त्यात त्याचा मृत्यू झाला.
सौजन्य डीनएइंडियान्यूज
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी कर्मचारी मिर्चीने भरलेली मोठी खोकी पहात होता. तेव्हा रोबोटने त्याला एक खोकाच समजून दाबल्याने त्याचा चेहरा आणि छातीला प्रचंड दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तरीही त्याचा प्राण वाचू शकले नाहीत.
‘अमेरिकन जर्नल ऑफ इंडस्ट्रियल मेडिसीन’ या संस्थेनुसार अमेरिकेत औद्योगिक रोबोट्समुळे आतापर्यंत ४१ लोकांचा जीव गेला आहे. यांपैकी ८३ टक्के घटनांत स्थिर काम करणार्या रोबोट्समुळे लोकांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियात याच वर्षीच्या मे महिन्यात एका चारचाकी उत्पादन करणार्या आस्थापनात एका रोबोटमुळेच एक कर्मचारी गंभीर घायाळ झाला होता. जुलै महिन्यात रशियामध्ये बुद्धीबळाच्या स्पर्धेच्या वेळी एका रोबोटने एका मुलाचे बोट तोडून टाकले.
संपादकीय भूमिकाविज्ञानाच्या अतिरेकाचेच हे फलित नव्हे का ? |