Afroz Ali Kidnap 15 months rape : अफरोझ अलीने हिंदु मुलीचे अपहरण करून तब्बल १५ महिने केला बलात्कार !
अन्यांकडूनही अत्याचार करवून घेतले; बलपूर्वक धर्मांतर करून केला विवाह !
सोनभद्र (उत्तरप्रदेश) – येथील अफरोझ अली नावाच्या एका मुसलमान युवकाने एका हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर १५ महिने बलात्कार केला. अन्यांकडूनही तिच्यावर अत्याचार करवून घेतले. मधल्या काळात तिचे बळजोरीने धर्मांतर करून घेऊन तिच्याशी विवाह केला. १५ महिन्यांनंतर ती त्याच्या तावडीतून सुटली. या प्रकरणी पोलिसांनी अफरोझ आणि त्याचा पिता यांना अटक केली आहे.
३१ ऑगस्ट २०२२ या दिवशी हिंदु पीडिता तिच्या महाविद्यालयाजवळ असलेल्या रस्त्यावर उभी होती. तेथे अफरोझ अली दुचाकीवरून आला. दोघांची ओळख असल्याने त्याने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले. त्याने तिला स्वत:च्या घरी नेऊन त्याच्या बहिणींकरवी तिला खाण्यातून औषध देऊन बेशुद्ध केले आणि दुसर्या राज्यात नेले. तेथे अफरोझने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला आणि अन्यांनाही तिच्यावर अत्याचार करायला लावले. कालांतराने तिला झारखंड राज्यातील गढवा येथे नेले आणि तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. लग्नानंतर कायनात खातून असे तिचे नाव ठेवण्यात आले. त्यानंतर त्याने तिला सोनभद्र येथे आणून एका खोलीत बंदी बनवले. तेव्हा तिने तिच्या कुटुंबियांना एका भ्रमणभाषवरून तिचे ‘लोकेशन’ पाठवल्याने पोलिसांनी तिला सोडवले आणि अफरोझ अन् त्याच्या पित्याला अटक केली.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेश राज्यात धर्मांतरविरोधी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही तेथील मुसलमान जनतेला या कायद्यांचा कोणताच धाक नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून लक्षात येते. या कायद्यांची कठोर कार्यवाही न केल्यानेच या घटना वारंवार घडत आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? |