५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील चि. निरवी निखिल तिवारी (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. निरवी निखिल तिवारी ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
(निरवी याचा अर्थ परमानंद)
धनत्रयोदशी (१०.११.२०२३) या दिवशी चि. निरवी निखिल तिवारी हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई, आजी, आत्या आणि तिच्या शेजारी रहाणारे यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. निरवी निखिल तिवारी हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. निधी तिवारी (चि. निरवीची आई), संभाजीनगर
१ अ. जन्मापूर्वी
१. ‘बाळ पोटात असतांना मला सतत देवाची ओढ वाटत असे. माझी ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त होत असे.
२. मी प्रतिदिन अग्निहोत्र करत असे. मी दत्तमाला मंत्रही म्हटले. ईश्वराने माझ्याकडून ध्यानधारणा करून घेतली.
३. मी विविध मंदिरात जाऊन फलकांवर धर्मशिक्षणविषयक लिखाण लिहिणे, धर्मफलक लावणे, अशा सेवा केल्या.
१ आ. जन्मानंतर
१. निरवी ५ मासांची झाल्यावर रांगायला लागली. तेव्हा ती वारंवार देवघरात जाऊन टाळी वाजवत असे.’
२. सौ. सविता तिवारी (निरवीची आजी (वडिलांची आई), नागेशी, गोवा.
२ अ. हसतमुख : ‘निरवी नेहमी झोपेतून हसत उठते. घरात एखादी व्यक्ती आल्यास ती त्यांना स्मितहास्य करून प्रतिसाद देते.
२ आ. देवाची आवड : ती ९ मासांची असतांना श्रीकृष्णाच्या चित्राची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांची पापी घेत असे.
२ इ. तिची निरीक्षणक्षमता चांगली आहे.
२ ई. तिला सांभाळतांना मला पुष्कळ आनंद होतो.
२ उ. तिच्या सहवासात माझा नामजप चांगला होतो.
२ ऊ. अनुभूती : तिच्याविषयी लिहित असतांना माझ्या हातावर पिवळ्या रंगाचे दैवी कण आढळले.
३. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (निरवीची मोठी आत्या), नागेशी, गोवा.
३ अ. गोवा येथे घरी आल्यावर रडणे; मात्र आश्रमात शांत रहाणे : ‘निरवी २ मासांची असतांना गोवा येथे आल्यावर ती पुष्कळ रडत होती. तिची दृष्ट काढली आणि तिला खेळवले, तरीही तिला शांत व्हायला वेळ लागत असे; मात्र आम्ही तिला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नेल्यावर तेथे ती दीड ते २ घंटे शांत होती.
३ आ. ती गोवा येथे आल्यावर जेव्हा मी तिला पहिल्यांदा हातात घेतले, तेव्हा माझा ‘राम राम’ असा नामजप आपोआप चालू झाला.’
४. श्री. गणेश दांडगे (निरवीचे शेजारी ), संभाजीनगर
४ अ. देवाची आवड : ‘चि. निरवी ९ मासांची असतांना मी तिला श्री स्वामी समर्थांच्या छायाचित्राकडे हात दाखवून म्हटले, ‘‘देवबाप्पा आहे. जय कर.’’ निरवीने माझे बोलणे लक्षात ठेवले. आता मी तिला ‘देवबाप्पा कुठे आहे ?’, असे विचारल्यास ती स्वामी समर्थ, समर्थ रामदासस्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांकडे बोट दाखवून डोके टेकवते.
४ आ. मी निरवीच्या समवेत असतांना ‘तिच्याकडून माझ्याकडे सकारात्मक स्पंदने येतात’, असे मला वाटते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ३.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |