सनातन आकाशकंदिलाचे महत्त्व जाणून ‘त्‍याचा लाभ इतरांना व्‍हावा’, अशी तळमळ असलेले सोलापूर येथील धर्मप्रेमी !

१. ‘नातेवाईक आणि मित्र यांना सनातन आकाशकंदिलातील सात्त्विकता अन् चैतन्‍य मिळावे’, अशी इच्‍छा असलेले श्री. मोहन कट्टा !

‘श्री. मोहन कट्टा धर्मशिक्षणवर्गात नियमित येतात. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. मागील वर्षी त्‍यांनी १० नातेवाइकांना सनातन आकाशकंदिल दिले होते. या वर्षी ‘नातेवाईक आणि मित्र यांना सनातन कंदिलातील सात्त्विकता अन् चैतन्‍य मिळावे’, यासाठी त्‍यांनी मागील वर्षीपेक्षा अधिक आकाशकंदिलांची मागणी केली.

कु. वर्षा जेवळे

२. ‘सनातन आकाशकंदिलांच्‍या माध्‍यमातून हिंदु राष्‍ट्राचा संदेश घरोघरी पोचावा’, अशी तळमळ असलेले श्री. अमर जळकोटे आणि श्री. किरण गायकवाड !

धर्मशिक्षणवर्गात आकाशकंदिलांच्‍या संबंधित विविध अनुभूती सांगितल्‍यानंतर श्री. अमर जळकोटे आणि श्री. किरण गायकवाड यांनी ‘त्‍यांच्‍या वसाहतीत रहाणार्‍या मित्र परिवाराला आकाशकंदिलांचा लाभ व्‍हावा, तसेच हिंदु राष्‍ट्राचा संदेश घरोघरी पोचावा’,  या उद्देशाने आकाशकंदिलांची मागणी केली.

३. सनातन आकाशकंदिलाच्‍या माध्‍यमातून धर्मप्रसार करणारे  श्री. धनंजय बोकडे आणि सौ. सपना बोकडे !

श्री. धनंजय बोकडे आणि सौ. सपना बोकडे यांनी वर्गात येणार्‍या सर्व धर्मप्रेमींना ‘सनातन आकाशकंदिल लावल्‍याने धर्मप्रसार कसा होतो ?’, याविषयी सांगितले. त्‍यामुळे वर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी स्‍वतःसाठी आणि नातेवाइकांना देण्‍यासाठी उत्‍साहाने आकाशकंदिलांची मागणी केली.

४. ‘सनातन आकाशकंदिल म्‍हणजे वास्‍तूसाठी अन् वास्‍तूत रहाणार्‍या कुटुंबासाठी गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत’, असा आकाशकंदिलाच्‍या प्रती भाव असणारे सौ. सविता गजरे आणि श्री. राहुल तळकोकुल !

सौ. सविता गजरे आणि श्री. राहुल तळकोकुल  यांनी ‘सनातन आकाशकंदिल, म्‍हणजे वास्‍तूसाठी अन् वास्‍तूत रहाणार्‍या कुटुंबासाठी गुरुदेवांचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) आशीर्वाद आहेत’, असा भाव ठेवून इतरांना सनातन आकाशकंदिलाचे महत्त्व सांगून मागणी केली.’

– कु. वर्षा जेवळे, जिल्‍हा सोलापूर. (१३.८.२०२३)