‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत ४०० लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान वाटप !
उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाच्या अंतर्गत ४०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. यात संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा शासनाच्या विविध योजनांचे सानुग्रह अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. या प्रसंगी सर्व वृद्धांनी श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराविषयी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सर्वश्री अजित चव्हाण, केरबा माने, सुनील केसरकर, मिलींद प्रभावळकर यांसह अन्य उपस्थित होते.