धन्वन्तरिदेवतेचा उत्सव !
आज धन्वन्तरि जयंती आहे. त्या निमित्ताने….
धन्वन्तरिदेवता समुद्रमंथनातून प्रकट झाली, ती अमृतकुंभ घेऊनच ! धन्वन्तरीच्या प्रकटनामुळे मृत्यूवर मात करून अमरत्वाचा लाभ मिळवण्याचा ऋषिमुनी आणि देवता यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आयुर्वेदाचे विद्वान आणि वैद्य मोठ्या कृतज्ञतेने ‘धन्वन्तरि जयंती’ साजरी करतात. अमरत्व म्हणजे यमराजांच्या तावडीतून सुखरूपपणे सुटका ! यासाठी यमदीपदान अन् यमुनास्नान करण्याची प्रथाही आहे. ‘या दिवशी चांदीचे भांडे खरेदी करावे आणि वापरावे. शक्य असेल, तर चांदीचे भांडे दान करावे’, अशी प्रथा आहे. चांदीच्या भांड्यात पाणी ठेवले की, ते शुद्ध होण्याची प्रक्रिया त्वरित चालू होते; म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणात प्रतिदिनच्या वापरात आपल्याकडे चांदीची भांडी वापरात असत.
– सौ. वसुधा ग. परांजपे, पुणे.
(साभार : मासिक ‘आदिमाता’, दीपावली विशेषांक, वर्ष १)