झारखंड येथे इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक
पॅलेस्टाईनमध्ये जाऊन ज्यूंशी लढण्याच्या सिद्धतेत होते !
रांची (झारखंड) – झारखंड आतंकवादविरोधी पथकाने राज्यातून आरिज हसनेन आणि महंमद नसीम यांना अटक केली आहे. या दोघांचे संबंध इस्लामिक स्टेटशी आहेत. याखेरीज या दोघांचे पाकिस्तानमधील आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत. पॅलेस्टाईनमध्ये जाऊन तेथील अल् अक्सा मशिदीला ज्यूंपासून सोडवण्याचा त्यांचा उद्देश होता.
Jharkhand ATS had received the information that Ariz Hasnain, a resident of Rahmat Nagar under Asanbani PS, Godda was spreading ISIS ideology through social media and radicalizing innocent people. Acting upon the information, ATS interrogated him and found his association with… pic.twitter.com/Hhx0uT0prz
— ANI (@ANI) November 8, 2023
राज्यातील गोड्डा येथे रहाणार्या हसनेन याला प्रथम अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून हजारीबागच्या नसीम याला पकडण्यात आले. हसनेन टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून जिहादी विचारांचा प्रसार करत होता.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या काळात हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र या देशात आतंकवादी केवळ धर्मांध मुसलमानच असून तेच आतापर्यंत यात सापडत आहेत; परंतु याविषयी काँग्रेस किंवा अन्य ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष एक शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! |