हमासचे आतापर्यंत ६० कमांडर ठार, तर १३० बोगदे उद्ध्वस्त !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने हमासच्या विरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत हमासचे ६० नेते आणि कमांडर यांना ठार मारले आहे. यासह हमासचे १३० बोगदेही नष्ट केले आहेत. गाझा पट्टीतील गाझा शहरातील अर्ध्या भागावर इस्रायलने नियंत्रण मिळवल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, युद्धानंतर गाझा पट्टी वेस्ट बँकमध्ये विलीन करण्यात यावी, जेणेकरून पॅलेस्टिनी लोक येथे सरकार स्थापन करू शकतील. वेस्ट बँकप्रमाणेच गाझामध्ये पॅलेस्टिनींना एकत्र आणून अधिकार निश्चित केले पाहिजेत.
सौजन्य विऑन
आतापर्यंत ५२० ट्रक साहाय्य साहित्य गाझाला पोचले !
गाझामध्ये युद्ध चालू झाल्यापासून आतापर्यंत ५२० ट्रक इजिप्तच्या रफाह सीमेवरून गाझा शहरात पोचले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांसाठी साहाय्याचे साहित्य होते.
अमेरिकेच्या ‘यूएस् स्टेट डिपार्टमेंट’चे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, गाझातील सामान्य लोकांना साहाय्याची नितांत आवश्यकता आहे. आमच्या अंदाजानुसार प्रतिदिन किमान १०० ट्रक सामग्री पोचली पाहिजे.