आत्मज्योतीला उजाळा देऊन स्वतःसह इतरांचीही दीपज्योत प्रज्वलित करणे, म्हणजे खरा दीपोत्सव होय !
ऋषींनी या सणाद्वारे आपल्याला जीवनदर्शन घडवून दिले. त्यामुळे ‘प्रत्येक व्यक्तीने या दृष्टीने आपला ‘मी आणि माझा’ भाव नष्ट करून आत्मजागृती करावी अन् आपल्या परीने या अंधःकारमय जगात दीपज्योतीप्रमाणे स्वतःची दीपज्योत उजळून तेवत ठेवावी. एवढेच नव्हे, तर त्याने इतरांच्याही आत्मज्योतीला उजाळा द्यावा, म्हणजे समाजातील ईश्वरनिष्ठ समुदाय सर्व आसमंतात आपल्या ईश्वरीकार्याने सर्वांच्या ज्योतीला उजाळा देईल आणि आसमंत उजळून निघेल. यालाच दीपोत्सव म्हणतात. आता अशा ईश्वरनिष्ठांच्या जीवनात पौर्णिमा आणि अमावास्या असा द्वैतभाव, उच्चनीचभाव अन् सुख-दुःख नसल्यामुळे सर्वत्र बंधुभाव निर्माण होईल, तसेच प्रत्येक जण आपले जीवन ‘जीवेत् शरदः शतम्’प्रमाणे (शरदऋतूतील कोजागरी पोर्णिमेप्रमाणे) १०० वर्षांपर्यंत सुखाने आणि आनंदाने घालवेल.
– (कै.) परात्पर गुरु परशराम पांडे महाराज