तापामध्ये औषधी पाणी
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४९
‘१ लिटर पाण्यात अर्धा चमचा सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्ये भरून ठेवावे.
ताप आलेला असल्यास किंवा येणार असे वाटत असल्यास जेव्हा तहान लागेल, तेव्हा हे नागरमोथ्याचे पाणी गरम गरम किंवा कोमट करून प्यावे. असे पूर्ण बरे वाटेपर्यंत करावे. यामुळे ताप लवकर बरा होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan