कोल्हापूर येथे ग्रामीण भागात प्रसार करतांना धर्मप्रेमींकडून मिळालेला प्रतिसाद !
१. वारकरी संप्रदायातील लोकांत पारायणाच्या माध्यमातून धर्मप्रसार करणारे ह.भ.प. विठ्ठल (तात्या) पाटील !
‘शिरोली गावातील ह.भ.प. विठ्ठल (तात्या) पाटील हे प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. तेव्हापासून ते धर्मकार्यासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रवचनाच्या वेळी साधकांना ‘लव्ह जिहाद’ याविषयी सूत्रे मांडण्यासाठी गावोगावी बोलावतात. ते वारकरी संप्रदायातील लोकांमध्ये पारायणाच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे नियोजन करतात.
२. धर्मप्रेमी सौ. वंदना कोळी यांनी लहान मुलांकडून नामजप करवून घेणे
सौ. वंदना कोळी या हालोंडी वर्गातील धर्मप्रेमी आहेत. त्या प्रतिदिन सत्संग संपल्यावर १० ते १२ वर्षांच्या लहान मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा ३ माळा नामजप करून घेतात. तसेच त्या मुलांकडून कापूर आणि अत्तर यांचे उपायही करून घेतात. ‘त्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागते आणि ती आता शांत झाली आहेत’, असे त्यांचे पालक सांगतात. हे ऐकून सभोवतालची मुलेही त्यांच्याकडे येत आहेत. आरंभी त्यांच्याकडे ४ – ५ मुले होती. आता त्यांच्याकडे १० – १२ मुले येतात. ‘ही सेवा करतांना त्यांचे मन शांत झाले आहे’, असे त्यांनी सांगितले.’
– आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), वारणानगर, कोल्हापूर. (१७.८.२०२३)