लव्ह जिहादविरोधात कठोर कारवाई करावी !
रणरागिणी शाखेची जळगाव जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
जळगाव, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – पारोळा तालुक्यातील एका महाविद्यालयात जात असतांना नाजीम या धर्मांधाने प्रवेशद्वाराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन हिंदु युवतीला गाठले आणि ‘माझ्याशी संपर्क न ठेवल्यास तोंडावर आम्ल फेकून चेहरा विद्रूप करीन’, अशी धमकी दिली. २ दिवसांनी पाचोरा तालुक्यातील दहिगावसंत या गावातून १८ वर्षीय हिंदु तरुणीला शेख नईम याने पळवून नेल्याचा आरोप संबंधित तरुणीच्या वडिलांनी केला. अन्य एका घटनेत जळगाव येथील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या तरुणीचे आफताब याने बळजोरीने शोषण केले. या घटना पहाता ‘लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु युवतींचे शोषण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी’, तसेच अशा घटना रोखण्यासाठी कठोर असा लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, याविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या !
१. जिल्ह्यात माध्यमिक शाळा, महाविद्यालये या भागात निर्भया पथके सक्रीय करावीत, तसेच अशा पथकांचे साहाय्य कसे घेता येईल, याविषयी शाळा – महाविद्यालयेे येथे जागृती करावी.
२. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये यांतील युवतींना स्वसंरक्षणाचे शिक्षण देण्याची व्यवस्था करून द्यावी.
३. राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ लागू करावा.
४. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी वा त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या धर्तीवर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. अशा प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत, अशी शिफारस राज्य शासनाला करावी, तसेच जिल्ह्यात या दृष्टीने प्रयत्न करावेत.
५. लव्ह जिहाद प्रकरणांत मदरसे आणि मशिदी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.