मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न पडल्‍याने शेतकर्‍यांनी मोसंबी बागेवर चालवली कुर्‍हाड !

प्रतीकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्‍याने दुष्‍काळसदृश परिस्‍थितीचा सर्वाधिक फटका मोसंबीच्‍या बागेला बसला आहे. मोसंबीसह अन्‍य फळबागा जगवणे अत्‍यंत जिकिरीचे ठरले आहे. पावसाअभावी विहिरी, तलाव आणि कूपनलिका कोरड्या पडलेल्‍या आहेत. त्‍यामुळे शेतकरी मोसंबीच्‍या बागा तोडत आहेत. पैठण तालुक्‍यातील कडेठाण येथील शेतकरी कल्‍याण तळपे यांनी १० वर्षांपूर्वी ३०० मोसंबीची लावलेली झाडे तोडली आहेत. पैठण तालुक्‍यातील अनेक गावांत आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्‍याची मागणी केली जात आहे.