परदेशी चलनाच्या तस्करी करणार्या टांझानियातील धर्मांधाला अटक !
मुंबई विमानतळावर कारवाई !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (‘सी.आय.एस्.एफ्.’च्या) जवानांनी परदेशी चलनाच्या तस्करी उघडकीस आणली. सीमाशुल्क विभागाने टांझानियाचा नागरिक असलेल्या यासिर अली महंमद याला अटक केली आहे. त्याच्याकडून अडीच लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे दोन कोटी रुपये किंमत) जप्त केले आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तस्करीत आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत भारतातील, तसेच विदेशातीलही धर्मांधच पुढे असतात, हे लक्षात घ्या ! पोलिसांनी अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्याविना गुन्हेगारीवर नियंत्रण येणार नाही ! |