नाशिक येथे १ लाखांची लाच मागणार्या पोलीस हवालदारासह तरुण अटकेत !
भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !
नाशिक – जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात ३५ सहस्र रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील विल्होळी पोलीस चौकीतील पोलीस हवालदार रवींद्र मल्ले यांच्यासह एक तरुणास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. मल्ले याने तक्रारदाराकडे प्रथम १ लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ३५ सहस्र रुपये द्यायचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पंचवटी येथील हिरावाडी येथील वाहतूक व्यवसायातील संशयित तरुण तोडी याने तक्रारदाराकडून लाचेची ३५ सहस्र रुपयांची रक्कम स्वीकारली. पथकाने त्यालाही अटक केली आहे.