आसाममध्ये हिंदु पुजार्यांना ‘बलात्कारी’ म्हणणार्या काँग्रेसच्या मुसलमान आमदाराला अटक
गौहत्ती (आसाम) – हिंदु चुकीची कामे करतात. मंदिराचे पुजारी बलात्कारी असतात, असे विधान करणारे आसाममधील काँग्रेसचे आमदार आफताब उद्दीन मोल्ला यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेसनेही या आमदारांना ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावली होती.
Assam Police has arrested Congress MLA Aftabuddin Mollah for allegedly making derogatory remarks about the priests, namgharias and saints. A case has been registered at Dispur police station under sections 295(a)/ 153A(1)(b)/505(2) IPC), confirms DGP GP Singh
More details…
— ANI (@ANI) November 8, 2023
आफताब यांनी गोलपारा येथे एका सभेला संबोधित करतांना ‘जेथे कुठे हिंदु आहेत, तेथे चुकीचे कामे होतात. मंदिरांचे पुजारी आणि नामघरची (आसाममधील एका समाजाचे धार्मिक स्थळ) देखभाल करणारे बलात्कारी असतात’, असे विधान केले होते.
संपादकीय भूमिकामौलाना (इस्लामी अभ्यासक), मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) आदी बलात्कारांच्या प्रकरणात पकडले जातात, त्याविषयी काँग्रेसचे आमदार कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! |