सहार पोलिसांच्या कह्यातून बांगलादेशी महिलेचे पलायन !
भारतामध्ये अवैधरित्या वास्तव्यास असल्याचे प्रकरण
मुंबई – भारतात अवैधरित्या वास्तव्यास असल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेने सहार पोलीस ठाण्यातून पलायन केले. कविता बेगम महंमद शाह आलम मिया (वय ३० वर्षे) असे तिचे नाव आहे. ती शौचालयात गेली होती, तेथून तिने पलायन केले. आरोपी महिलेचा शोध चालू आहे. महिला पोलीस शिपाई ललिता कोते यांच्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खोटी कागदपत्रे सिद्ध करून ती अवैधरित्या भारतात राहिल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. तिला तिसर्या मजल्यावरील महिला अंमलदार कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. तेथील शौचालयात गेल्यावर तिने वरील प्रकार केला.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी महिलेवर लक्ष ठेवू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे पकडणार ? |