Human Trafficking NIA raids : मानव तस्करीच्या प्रकरणी ‘एन्.आय.ए.’च्या ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत धाडी !

जम्मूतील एका रोहिंग्या मुसलमान कह्यात !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मानव तस्करीमध्ये सहभागी लोकांना पकडण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथे धाडी घातल्या. या वेळी जम्मूतील बठिंडी येथून म्यानमारच्या एका रोहिंग्या मुसलमानाला कह्यात घेण्यात आले. या व्यक्तीचे नाव जफर आलम आहे. आलमला तात्कालिक निवासातून कह्यात घेण्यात आले, तर त्याचा एक सहकारी फरार आहे. पारपत्र अधिनियमाचे उल्लंघन आणि मानव तस्करी, यांसंबंधीच्या प्रकरणात आलमचे अन्वेषण करण्यात येत आहे.

एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी सांगितले की, हरियाणा, राजस्थान, त्रिपुरा, आसाम, बंगाल, कर्नाटक, तेलंगाणा आणि तामिळनाडू ही राज्ये, तसेच जम्मू-काश्मीर अन् पुद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश, येथे या धाडी घालण्यात आल्या.