मदरशाच्या हाफीजकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !
(हाफीज म्हणजे मदरशामध्ये कुराण शिकवणारी व्यक्ती)
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील एका अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणार्या एका मदरशाच्या हाफीजला पोलिसांनी नुकतीच अटक केली. गुलफाम असे या हाफीजचे नाव असून तो एका स्थानिक मदरशात कुराण शिकवतो. पीडित मुलीने आरडाओरड करून गुलफामच्या तावडीतून स्वत:ला वाचवले.
पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. आरोपी हाफिजला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आरोपीने त्यांच्या घरात केलेली ही तिसरी घटना आहे. याआधीही गुलफामने पीडितेच्या दोन बहिणींचा विनयभंग केला होता.
संपादकीय भूमिकाअशी वृत्ते प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |