श्री महालक्ष्मीची कृपा राहो सदैव …
३० ऑक्टोबर या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. विनायक शानभाग यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. विद्या शानभाग यांनी त्यांच्याविषयी लिहिलेली कविता येथे देत आहोत.
जन्म झाला ज्याचा केवळ ईश्वरी कार्यासाठी ।
झटतो निरंतर जो ईश्वरी कृपेसाठी ॥
ज्यांच्या ध्यानी, मनी, चित्ती वसे
श्रीमन्नारायण आणि त्याची शक्ती ।
सावली बनुनी श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्तींची,
त्यांची आज्ञेची जो वाट पाही ।
त्यांच्या आज्ञापूर्तीसाठी स्वतःला
विसरून तो झेपही घेई ॥ १ ॥
जो असे श्रद्धा, भाव आणि भक्तीचा धनी ।
जोडतो सहस्र जणांना त्याच्या आंतरिक प्रीतीनी ।
भावविभोर करतो समष्टीला भगवंताची लीला वर्णूनी ॥ २ ॥
परिस्थिती हाताळण्याचे जात आहे कुशलता ।
मनमोकळेपणाची आहे ज्यात समृद्धता ।
वदनी दिसे उत्साह, आनंद आणि निरागसता ॥ ३ ॥
आयुष्यात जरी असे सर्व काही,
गुरुविना तो सर्व व्यर्थ जाई ।
तुमचे भाग्य थोरात थोर कारण
साक्षात् महालक्ष्मी झाली तुमची आई ॥ ४ ॥
श्रीचित्शक्तींची संपूर्ण कृपा तुम्हाला मिळो आणि संपूर्ण समष्टी कार्यास तुमचे अखंड योगदान होवो, अशी आजच्या शुभदिनी आम्ही सर्व साधक भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.
तुम्हाला वाढदिवसाचे अनेकानेक शुभेच्छा आणि नमस्कार !!!
– सौ. विद्या शानभाग, सनातन आश्रम, फोंडा, गोवा.