ताप आलेला असतांना काय खावे ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४८
‘ताप आलेला असतांना शक्य असेल, तर एक वेळ काही न खाता उपवास करावा. उपवास करणे शक्य नसल्यास एका पातेल्यात थोडे तांदूळ नेहमीपेक्षा जरा जास्त पाणी घालून शिजवावेत आणि ते चांगले शिजले की, शिल्लक राहिलेले पाणी गाळून त्यात चवीपुरते मीठ घालून प्यावे. या पाण्याला ‘पेज’ असे म्हणतात. पेज प्यायल्याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्यायल्याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्यास साहाय्य होते. यानंतर भूक लागल्यास वरणभात, रव्याचा उपमा किंवा शिरा, तांदळाचे न आंबवता केलेले घावन, भाताच्या किंवा ज्वारीच्या लाह्या, मूगडाळ शिजवून तिच्यात चवीपुरते मीठ आणि गूळ घालून बनवलेले ’कढण’ असे पचायला हलके पदार्थ थोडीशी भूक शिल्लक ठेवून खावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan