अयोध्येतील राम पथाजवळील बद्र मशिदीचे स्थानांतर थांबले !
मुसलमानांनी केला विरोध !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचा पहिला टप्पा पूर्ण करून २२ जानेवारी २०२४ या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठ करण्यात येणार आहे. मंदिराच्या अनुषंगाने संपर्ण अयोध्येचा कायपालट करण्यात येत आहे. या अंतर्गत येथे राम पथ बांधण्यात येत आहे. याच्या शेजारी असणारी बद्र मशीद तेथून पांजी टोला येथे स्थानांंतरित करण्यात येणार आहे; मात्र आता या स्थानांतराला विरोध केला जात आहे.
१. या संदर्भात बद्र मशिदीचे व्यवस्थापन पहाणारे रईस अहमद आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्यात करार झाला होता. न्यासाकडून मशिदीला ३० लाख रुपये देण्यात येणार होते. ६ महिन्यांत ही मशीद स्थानांतरित करायची होती; मात्र या कराराला अंजुमन मुहाफिज मकाबीर-मसाजिद कमेटीचे सरचिटणीस महंमद आझम कादरी यांनी विरोध केला आहे.
२. या संदर्भात रईस अहमद म्हणाले की, नमाजपठणासाठी येणार्यांच्या सहमतीने स्थानांतराविषयी ठरवले होते; मात्र आता त्यांचा विरोध होत असल्याने स्थानांतर रोखण्यात आले आहे. आता दिवाळीनंतर जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून आम्ही पुढील निर्णय घेऊ.