परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्या धोरणांवर भाष्य
भारताची हुशार मुत्सद्देगिरी पुन्हा सक्रीय !
‘भारत देश स्वतःच्या आवश्यकतेनुसार ७० टक्के तेल पश्चिम आशियातून घेतो. इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षामुळे तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत होणार अन् पर्यायाने तेल महागणार. त्यामुळे भारताने हुशारीने व्हेन्झुएला या देशाकडून स्वस्तात तेल घेण्याचा निर्णय घेतला, जसे गेल्या वर्षी रशियाकडून स्वस्तात तेल घेतले तसे !
आशियातील सर्वांत मोठा ‘शस्त्र निर्यातदार’ देश भारत !
जो देश आशियातील सर्वांत मोठा ‘शस्त्र आयातदार’ म्हणून ओळखला जायचा, तोच भारत देश आता आघाडीचा ‘शस्त्र निर्यातदार’ बनत आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रातील विक्रमी निर्यात १५ सहस्र ९०० कोटी रुपये झाली. वर्ष २०१६-१७ मध्ये ही निर्यात १ सहस्र ५२१ कोटी होती, म्हणजे त्यात १० पटींनी वाढ झाली आहे. पुढील ५ वर्षांत भारताने २५ सहस्र कोटी रुपयांच्या शस्त्र निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.’
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुक’ पानावरून साभार)