छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्या धर्मांधाला अटक करावी !
समस्त शिवप्रेमी हिंदु बांधवांचे दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन
दोंडाईचा (धुळे) – शहरातील एका धर्मांधाने महाराष्ट्राचे आराध्य असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने समस्त हिंदु बांधवांच्या भावना दुखावल्या. यातून शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्यात आला असून कायदा-सुव्यवस्था यांचा, तसेच जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून क्रूरकर्मा औरंगजेब याचे उदात्तीकरण करण्याचा यामागे हेतू आहे. अशा प्रकारच्या घटना याआधी अहिल्यानगर आणि कोल्हापूर येथेही घडल्या आहेत. त्या काळात तेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. असा प्रश्न आपल्या दोंडाईचा शहरात निर्माण होऊ नये; म्हणून अशा धर्मांधाला लवकरात लवकर अटक करून त्यावर कठोर कारवाई करावी, अशी समस्त शिवप्रेमी हिंदु बांधवांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन दोंडाईचा येथील पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.
संपादकीय भूमिका :हे पोलिसांना का सांगावे लागते ? ते स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? असे निष्क्रीय पोलीस काय कामाचे ? |