राजापूर येथे ‘हलालमुक्त’ दिवाळीच्या खरेदीला प्रारंभ !
राजापूर, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. विवेक गुरव यांनी येथील श्री. ठाकूर यांच्या प्रसिद्ध ‘आझाद बेकरी’मध्ये शाकाहारी केकची मागणी (ऑर्डर) केली होती. हा केक स्वीकारण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी ‘हा शाकाहारी केक ‘हलालयुक्त’ आहे का ?’, अशी विचारणा केल्यानंतर संबंधित मालकांनी तो ‘हलाल प्रमाणित’ असल्याचे सांगितले. तेव्हा विवेक गुरव यांनी ‘हलाल प्रमाणित’ केक स्वीकारण्यास नकार दिला आणि केलेली मागणी रहित केली.
‘कारण नसतांना मुसलमानेतर ग्राहकांच्या माथी ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने मारली जात आहेत’, या गोष्टींचा विरोध केल्यामुळे विवेक गुरव यांचे ‘हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान’कडून विशेष कौतुक करण्यात आले. विवेक गुरव यांच्या या कृतीचे समाजातून स्वागत केले जात आहे. यापुढे अनेकांनी स्वतःहून हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला.
संपादकीय भूमिका
|