देहलीमध्ये बसले भूकंपाचे धक्के !
नवी देहली – देहली आणि एन्.सी.आर्. भागात ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. याची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.६ इतकी मोजण्यात आली. याचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाचे धक्के नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.