जिंद (हरियाणा) येथे ५० अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणार्या मुख्याध्यापकाला अटक !
जिंद (हरियाणा) – येथे ५० अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.
हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, आमच्याकडे ६० मुलींच्या लेखी तक्रारी आल्या. त्यांतील ५० विद्यार्थिनींनी हा आरोप केला होता की, शाळेत त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले. इतर १० मुलींचे म्हणणे होते की, मुख्याध्यापक हे प्रकार करतात, हे त्यांना ठाऊक होते. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करत मुख्याध्यापकाला अटक केली आहे. त्याच्यावर कलम ३५४ अ, कलम ३४१ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाशिक्षकांकडूनच असे कृत्य होत असतील, तर पालकांनी विश्वास कुणावर ठेवायचा ? अशांना फाशीचीच शिक्षा दिल्यावर इतरांवर वचक बसेल ! |