सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६३ वर्षे) !

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्याविषयी साधकांना जाणवलेल्या सूत्रांचा काही भाग ३.११.२०२३ या दिवशी पाहिला.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/733473.html

आज पुढील भाग पाहूया.


आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

२ आ ३ ऐ. सौ. योगिता चेऊलकर, फोंडा, गोवा.

१. आजारी असतांना वडिलांप्रमाणे काळजी घेणे : ‘वर्ष २०२१ मध्ये मला आणि माझे यजमान श्री. प्रसाद चेऊलकर यांना ‘कोरोना’ झाल्याचे निदान झाले. आम्ही डॉ. मराठे यांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी प्रत्येक टप्प्याला आम्हाला साहाय्य केले आणि ‘वडील जशी काळजी घेतात’, तशी आमची काळजी घेतली. माझे यजमान पुष्कळ आजारी असल्याने मला चिंता वाटत होती; मात्र मराठेकाका मला शांत राहून समजावून सांगत, ‘चिंता करू नका. वैद्यकीय उपचार आणि आध्यात्मिक उपाय यांवर लक्ष केंद्रित करा.’

२. कठीण परिस्थितीत साहाय्य करण्यास सदैव तत्पर असल्याने आधार वाटणे : आम्हाला ‘कोरोना’ चाचणी करून घ्यावी’, असे तीव्रतेने वाटत होते; परंतु मराठेकाका ‘काहीही होणार नाही’, याची आम्हाला निश्‍चिती देत होते. त्यामुळे या कठीण परिस्थितीतही आम्ही सकारात्मक राहू शकलो. मी कधीही त्यांना दूरभाष करत असे आणि काका साहाय्य करण्यास सदैव तत्पर असत. कितीही गंभीर वैद्यकीय समस्या असली, तरी काका नेहमी स्थिर असतात आणि ‘काळजी करू नका. आम्ही पहातो’, असे म्हणून आम्हाला आश्‍वस्त करतात. यातून आम्हाला काकांचे साहाय्य होऊन त्यांचा आधार वाटतो.

भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून प्रार्थना करते की, ‘मराठेकाकांची जलद आध्यात्मिक उन्नती होवो.’ (९.३.२०२३)

२ आ ४. इतर गुणवैशिष्ट्ये

२ आ ४ अ. श्रीमती मीरा करी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा.

१. मनमोकळेपणा आणि सहजस्थिती : ‘एकदा आधुनिक वैद्य मराठेकाका आश्रमाच्या पायर्‍या चढत असतांना मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा मला नमस्कार करत ते म्हणाले, ‘‘आता मला पायर्‍या चढणे थोडे अवघड जात आहे. मला गुडघेदुखी चालू झाली आहे. ‘म्हातारपण आले आहे ना ? एकामागून एक त्रास चालू होत आहेत.’’ ते एक उत्तम आधुनिक वैद्य असूनही त्यांनी सहजतेने आणि कुठलाही अहं न बाळगता मला त्यांची स्थिती सांगितली. त्यांचे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली.’

२ आ ४ आ. सौ. सुजाता रेणके, फोंडा गोवा.

१. आश्रमातील कार्यपद्धतीचे पालन करणे : ‘वर्ष २०१६ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवीनच आले होते. एकदा मी सायंकाळचा अल्पाहार करण्यासाठी भोजनकक्षात बसले होते. आधुनिक वैद्य मराठेकाका माझ्यासमोरच बसले होते. मी अल्पाहार वाढून घेतला; परंतु मराठेकाकांनी अल्पाहार घेतला नव्हता; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही अल्पाहार करत नाही का ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘अजून अल्पाहार घेण्याची उद्घोषणा झाली नाही. उद्घोषणा झाल्यानंतर मी अल्पाहार घेईन.’’ तेव्हा मला ‘मराठेकाका आश्रमातील कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करतात’, हे शिकायला मिळाले.’

२ आ ४ इ. श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. सेवा परिपूर्ण करणे : ‘आधुनिक वैद्य मराठेकाकांनी माझ्या आजारासाठी दिलेले औषध नेहमी अचूक आणि परिणामकारक असते. कोरोना महामारीच्या काळातही मला नेहमी सर्दी होत असे. तेव्हा मला तज्ञ वैद्यांना (स्पेशालिस्टला) दाखवण्यासाठी त्यांनी स्वतः नियोजन केले. यावरून ‘ते परिपूर्ण सेवा करतात’, असे मला वाटते.

२. रुग्णांना आवश्यक तेवढीच औषधे देणे : ते माझ्या आजारासाठी आवश्यक तेवढीच औषधे घ्यायला सांगायचे. ते मला ‘२ दिवस अमुक अमुक करा. मग बघूया’, असे सांगायचे.

. अहं अल्प असणे : मला बाहेरच्या ३ वेगवेगळ्या तज्ञ वैद्यांना दाखवून उपचार घ्यायचे होते. त्या वैद्यांनी जे उपचार करायला सांगितले होते, त्यात काकांनी काहीही ढवळाढवळ केली नाही. यावरून ‘काका नैतिकता (एथिक्स) पाळतात’, असे माझ्या लक्षात आले, तसेच ‘काकांचा अहं अल्प आहे’, असे मला वाटते.

४. तत्त्वनिष्ठता : मराठेकाका सर्वांना पूर्ण साहाय्य करतात; पण ते भावनिक न होता तत्त्वनिष्ठतेने सांगतात. ते भावनिक स्तरावर ‘काहीही झालेले नाही. सर्व चांगले आहे’, असे सांगत नाहीत.  अस्थीभंग झाला होता. तेव्हा काका मला म्हणाले, ‘‘मला अस्थीभंगच वाटतो आणि शस्त्रकर्म करावे लागू शकते. त्या सिद्धतेने रुग्णालयात जा.’’ (११.३.२०२३)

२ आ ४ ई. रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. स्वीकारण्याची वृत्ती : ‘काका दिसल्यावर आश्रमातील साधक त्यांना प्रश्‍न विचारतात. काकांच्या सेवेची व्याप्ती पुष्कळ आहे; मात्र ‘काका कधी चिडले आहेत’, असे मी पाहिले नाही. त्यांना राग आला, तरी तो क्षणिक असतो. ते लगेच पूर्ववत् होतात. साधकांनी काकांना सांगितलेल्या काही गोष्टींचे काकांना विस्मरण झाल्यास ते ‘मी विसरलो’, असे मोकळेपणाने मान्य करतात.’ (७.३.२०२३)

(क्रमशः)