सर्व साधकांप्रती मनात वात्सल्यभाव असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
१. श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ यांचा रामनाथी आश्रमात प्रथमच वाढदिवस साजरा होणे
‘वैशाख कृष्ण अष्टमी (२३.५.२०२२) या दिवशी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मुलगा श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ यांचा २५ वा वाढदिवस होता. श्री. सोहम् यांचा रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच वाढदिवस साजरा होणार होता. त्यांच्या वाढदिवसासाठी आम्ही काही साधक एका खोलीत जमलो होतो. तेव्हा मला खोलीत चैतन्य जाणवून ‘मी एका वेगळ्याच युगात आहे’, असेे जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी उपस्थित साधकांना ‘मी तुमचेही औक्षण करत आहे’, असा भाव ठेवण्यास सांगणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी श्री. सोहम् यांचे औक्षण करायला आरंभ करतांना उपस्थित आम्हा सर्व साधकांना सांगितले, ‘‘मी सोहमचे औक्षण करत असले, तरी ‘तुम्ही सर्व जण सोहम् आहात आणि मी तुमचेही औक्षण करत आहे’, असा भाव तुम्ही सर्वांनी ठेवा.’’ तसा भाव ठेवल्यावर आम्हाला ‘आमचाही वाढदिवस आहे’, असे वाटत होते आणि ‘देवीच आमचे औक्षण करत आहेे’, असे वाटून आमची भावजागृती झाली.
३. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा सर्व साधकांप्रती वात्सल्यभाव आहे’, असे जाणवणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या मुलाचा वाढदिवस असूनही त्यांनी ‘मी तुमचेही औक्षण करत आहे’, असा भाव ठेवायला आम्हाला सांगितला. यावरून ‘माझ्या मुलाचा वाढदिवस आहे’, असा अहंचा लवलेशही त्यांच्यामध्ये नव्हता, उलट त्यांच्यासाठी सर्वच साधक सोहम् आहेत, म्हणजेच सर्व साधक त्यांची मुले आहेत’, असा त्यांचा भाव जाणवला.
यातून ‘त्यांच्या मनात सर्व साधकांप्रती किती प्रीती, आपुलकी आणि जवळीक आहे’, याची मला जाणीव झाली. ‘त्यांना सर्व साधकांची आई का म्हणतात’, याची मला पुन्हा एकदा प्रचीती आली.’
– कु. मानसी विनोद अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२२)