देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !
वायू गुणवत्ता निर्देशांक ७०० वर पोचला !
नवी देहली – भारताची राजधानी देहली शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक ७०० च्या पुढे पोचला आहे. यामुळे देहली शहर जगातील सर्वाधिक १० प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे. साधारणतः १०० निर्देशांक हा सामान्य मानला जातो. त्यानंतर तो धोकादायक ठरतो. देहली नंतर कोलकाता २०६ निर्देशांकामुळे तिसर्या, तर मुंबई १६२ निर्देशांकामुळे पाचव्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले आहे. सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचित पाकिस्तानचे लाहोर शहर दुसर्या क्रमांकावर आहे.
सौजन्य मिरर नाऊ
१. प्रदूषणामुळे देहली सरकारने प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. देहलीच्या शिक्षणमंत्री अतिशी यांनी सांगितले की, इयत्ता ६ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गांचा विचार केला जात आहे.
२. वैद्यकीय तज्ञांच्या मते प्रदूषणामुळे त्वचा आणि हृदय यांच्याशी संबंधित आजार होण्याचा धोका आहे. याखेरीज मधुमेह, अल्झायमर आणि डोकेदुखी यांचा त्रास होऊ शकतो. प्रदूषणाचा श्वसनसंस्थेवरही परिणाम होतो. लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यांची मानसिक शक्ती न्यून होऊ लागते.
संपादकीय भूमिकाचांगल्या गोष्टींसाठी नाही, तर वाईट गोष्टींसाठीच भारताची राजधानी सर्वांत पुढे असते, हे लज्जास्पद ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन आणि जनता उत्तरदायी आहे ! |