गोवंशियांच्या मांसाची विक्री करणारे दोघे अटकेत !
गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही व्हायला हवी !
जळगाव – येथे गोवंशियांची हत्या करून त्यांच्या मांसाची विक्री करणारे रिजवान खान सलीम खान कुरेशी (वय २३ वर्षे) आणि इरफान खान सलीम खान (वय २३ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ सहस्र रुपये किमतीचे ८० किलो गोवंशियांचे मांस, ५०० रुपये किमतीची कुर्हाड आणि सुरी असा एकूण १० सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.