कराड येथे झालेल्या स्फोटातील घायाळांपैकी दोघांचा मृत्यू !

प्रतीकात्मक छायाचित्र

कराड – येथील मुजावर कॉलनीत झालेल्या भीषण स्फोटात घायाळ झालेले शरीफ मुल्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. घायाळ व्यक्तींवर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुल्ला यांच्या घरात झालेला स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचे प्राथमिक कारण पोलीस सांगत आहेत. स्फोटाचे कारण अद्याप प्रशासनाने सांगितले नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.