हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून धर्माचरणाला आजपासूनच आरंभ करा ! – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती
बेळगाव – भारत देशाची संस्कृती महान असून ही संस्कृती प्रत्येक देशाने अंगीकारल्यास जगात शांतता टिकून राहील. आरोग्य क्षेत्रात भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आपण विदेशी परंपरांच्या मोहाला बळी न पडता भारतीय संस्कृतीचे जतन-संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ‘जितो’ (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्षा कमलाजी गडिया यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘मनोज संचेती जितो सभागृह’ येथे ‘जितो’च्या महिला सदस्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘चंद्रग्रहण कधी होणार, ते मिनिटांच्या कालावधीत अचूक असे एक वर्षांपूर्वी हिंदूंच्या दिनदर्शिकेत लिहिलेले असते, यावरून हिंदु धर्म किती महान आहे हे लक्षात येते. याउलट आताच्या वैज्ञानिक वेधशाळेला नेमका पाऊस कधी पडणार ? तेही नीट सांगता येत नाही.’’
या मार्गदर्शनासाठी पदाधिकारी, सदस्य असे ७५ जण उपस्थित होते. मार्गदर्शन झाल्यावर श्री. सुनील घनवट यांचा ‘जितो’कडून विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ‘जितो बेळगाव’चे अध्यक्ष श्री. वीरधवल उपाध्ये, ‘जितो’ महिला समुहाचे समन्वयक आणि मार्गदर्शक श्री. अभय अदवाणी उपस्थित होते. ‘जितो’चे श्री. विक्रम जैन यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे स्वागत ‘जितो’ महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. माया जैन यांनी केले, प्रास्ताविक सौ. हर्षिता मेहता यांनी केले, श्री. सुनील घनवट यांचा परिचय सौ. तृप्ती मांगले यांनी करून दिला, तर मुख्य सचिव सौ. ममता जैन यांनी आभार प्रदर्शन केले.
क्षणचित्रे
१. ‘हलाल जिहाद’ची भयावहता लक्षात आल्याने, तसेच यामुळे सर्वजण अंतर्मुख झाल्याने अनेकांनी सांगितले.
२. ‘यापुढील काळात युवतींसाठी ‘लव्ह जिहाद’ विषयावर विशेष, तसेच पुरुषांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करू’, असे आयोजकांनी सांगितले.