उल्हासनगर येथे परवाने नसलेल्या फटाक्यांच्या ४ दुकानांवर कारवाई !
२ लाख रुपयांचा दंड आकारला
ठाणे, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – उल्हासनगर येथे फटाक्यांची मोठी बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून व्यापारी आणि नागरिक तेथे फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. शहरात परवाने घेऊन व्यवसाय करणारी ३६ फटाक्यांची दुकाने आहेत. त्यापैकी ३ नोव्हेंबरला अग्नीशमन विभागाकडून १५ दुकानांचे सर्वेक्षण केले असता ४ दुकानदारांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याचे उघड झाले. या दुकानांवर प्रत्येकी ५० सहस्र रुपये असा एकूण २ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर अन्य दुकानांचे सर्वेक्षण शेष आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून दुकाने थाटणार्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.