अहिल्यानगर येथील साहाय्यक अभियंत्याला १ कोटी रुपयांची लाच स्वीकारतांना पकडले !
२ कोटी ६६ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी मागितली लाच !
नगर – जुन्या कामांचे देयक संमत करण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी अहिल्यानगर येथील औद्योगिक विकास महामंडळातील (‘एम्. आय.डी.सी.’तील) साहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अमितने तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्यासाठी लाच घेतली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कंत्राटदार अरुण मापारी यांच्या ‘मापारी इन्फ्रा प्रोजेक्टस्’द्वारे अहिल्यानगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत १०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ सहस्र २४४ रुपयांचे देयक संमत करण्यासाठी अभियंत्याने लाच मागितली. तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
संपादकीय भूमिका
|