उद्योगपती मुकेश अंबानी यांना ५ वेळा धमक्या देणार्याला अटक !
८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !
मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल करणार्याला मुंबई पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली आहे. गणेश वानपारधी असे त्याचे नाव असून त्याने आतापर्यंत धमकीचे ५ ईमेल केले आहेत. आधी २० कोटी रुपये, नंतर २०० आणि त्यानंतर ४०० कोटी रुपयांची मागणीही त्याने केली होती. ८ नोव्हेंबरपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.