सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात लिहिले आक्षेपार्ह लिखाण !

त्वरित गुन्हा नोंद करण्याची ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची मागणी !

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील मुलांच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह लिखाण लिहिण्याचा प्रकार झाला आहे. ‘या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने नोंद घेऊन गुन्हा नोंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिली आहे.

याविषयी बोलतांना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘असा प्रकार करणार्‍या समाजकंटकांचा विद्यापीठ प्रशासन निषेध करत आहे. संबंधितांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.’’

संपादकीय भूमिका :

  • पंतप्रधानांच्या विरोधात लिखाण करण्याचे धाडस करणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
  • अभाविपला अशी मागणी का करावी लागते ? विद्यापीठ प्रशासन स्वतःहून लक्ष घालून कारवाई का करत नाही ?