आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

५०० कोटी रुपयांच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचे प्रकरण

आमदार रवींद्र वायकर

(अवैधरित्या कमावलेला काळा पैसा कायदेशीररित्या कमावलेला पैसा म्हणून वापरणे आणि अनधिकृतपणे प्राप्त निधी लपवला जाणे, त्याला ‘मनी लाँड्रिंग’ असे म्हणतात.)

मुंबई – ५०० कोटी रुपयांच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यावर ‘ईडी’ने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

१. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. वायकर यांनी मुंबई येथील जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर १ पंचतारांकित उपाहारगृह बांधल्यासंबंधीची तक्रार होती.

२. मुंबई महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांनीही या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. वायकर यांनी उपाहारगृह बांधण्यापूर्वी महापालिकेची अनुमती घेतली नव्हती. ‘हा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे’, असा दावा तक्रारीत केला आहे.

४. तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठीही बोलावले होते. त्यानंतर रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, पृथ्वीपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

५. याच प्रकरणात ‘मनी लाँड्रींग’चाही ‘ईडी’ला संशय आहे.