पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करतांना ४ जणांना अटक, एकावर गुन्हा नोंद !
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेले पुणे !
पुणे – लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे गुप्तचर विभाग आणि पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्तपणे कारवाई करत मेफेड्रॉन (एम्.डी.) या अमली पदार्थाची विक्री करणार्या ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख १४ सहस्र रुपयांचे अमली पदार्थ आणि ४ भ्रमणभाष असे ३ लाख २४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रोनित खाडे, चैतन्य सावले, सार्थ खरे आणि विशाल मेहता अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर अनुश माने याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर घोरपडे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिकातरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावणार्या तरुण गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांचे विक्री जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे ! |