इंस्टाग्रामद्वारे ओळख वाढवून युवतीवर बलात्कार !

सातारा, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – इंस्टाग्राम खात्याद्वारे ओळख झालेल्या अल्पवयीन युवतीला एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात विशाल बाळकृष्ण अवघडे (वय ३५ वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

पीडित युवती १७ वर्षांची असून विशाल आणि तिची इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे भेटी-गाठीमध्ये झाले. विशाल यांनी पीडित युवतीला दुचाकीवर बसवून सातारा शहरातील विविध ठिकाणी फिरवले, तसेच २६ ऑक्टोबर या दिवशी पाठखळ येथील एका लॉजवर गोड बोलून नेले आणि बलात्कार केला. घाबरलेल्या पीडित युवतीने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. ती घरामध्ये शांत रहात असल्याने आईने तिची चौकशी केली. या वेळी पीडित युवतीने घडलेला प्रकार आईला सांगितला. नंतर आईसह पीडित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका 

वासनेने आंधळे झालेले युवक निर्माण होणे, हे समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! अशा प्रकारे वेगाने समाजाची नीतिमत्ता खालावत जाणे समाजासाठी घातक !