इस्रायल-हमास युद्धावरून होत असलेले जागतिक ध्रुवीकरण आणि मुसलमानेतरांची स्थिती
जिहाद हा आतंकवादासाठी पर्यायी शब्द आहे, हे परत एकदा सिद्ध झाले आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी हमासने इस्रायलवर क्रूरपणे केलेल्या आक्रमणाला सर्व जग साक्षी आहे. पॅलेस्टाईनच्या जिहादी गटांनी इस्रायलच्या विरोधात रस्ते, पाणी आणि हवा या सर्व माध्यमांतून इस्रायलला कोणतीही पूर्वसूचना न देता आक्रमण करत ‘अघोषित युद्ध’ चालू केले. हमासच्या आतंकवाद्यांनी ‘केवळ नागरिकांना लक्ष्य केले’, असे नाही, तर अमानुषपणे हत्या करणे, अपहरण आणि बलात्कार करणे इत्यादी क्रूर अपप्रकार केले. अत्याचार झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. त्यामुळे हमासच्या या कुकृत्यांविषयी जगभरातून वेदनेची लाट पसरली. इस्रायलवर केलेल्या या सैतानी आक्रमणाविषयी हमासला कोणताही पश्चात्ताप झालेला नाही. हमासला याविषयी पाठिंबा देणार्या देशांमध्ये इराण, लॅबेनॉन, तुर्कीये, पाकिस्तान, सीरिया, इराक, कतार, जॉर्डन आणि इतर बहुतांश इस्लामी राष्ट्रांचा समावेश आहे. दुसरीकडे अमेरिका, भारत, युरोपियन संघ, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया इत्यादी जवळजवळ ८५ देश इस्रायलच्या पाठीशी उभे राहिले.
१. काँग्रेसकडून पॅलेस्टाईनचा आंतरराष्ट्रीय आतंकवादी यासर अराफतला ‘नेहरू शांतता पुरस्कार’ !
काही स्वयंघोषित बुद्धीवादी ‘हमास आणि पॅलेस्टाईन यांमध्ये तफावत आहे’, असे सांगून पॅलेस्टाईनचा यात दोष नाही’, असे भासवत आहेत; परंतु ‘पॅलेस्टाईन हा जगातील पहिला आतंकवादी देश आहे’, हे ते सोयीस्करपणे विसरत आहेत. या ६ दशकांच्या आधी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांच्या सरकारने यासर अराफत या पहिल्या आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याला ‘नेहरू शांतता पुरस्कार’ अन् १ कोटी रुपयांची देणगी दिली. पॅलेस्टाईन हे ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून मान्यता देऊन इंदिरा गांधी यांनी त्याला १ विमान भेट दिले. यांसह या सर्वांत धोकादायक आतंकवाद्याला उस्मानिया विद्यापिठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (डॉक्टरेट) पदवी बहाल केली.
२. इस्रायलने हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या विरुद्ध घेतलेला सूड हा त्याचा अधिकार !
हमास हा पॅलेस्टाईनचाच एक भाग असून त्याच्या मुख्य संघटनेहून तो काही वेगळा नाही. या आक्रमणामुळे पीडित झालेल्या इस्रायलने वरपांगी काहीही न म्हणता ‘हमास आणि पॅलेस्टाईन यांना ते अनेक वर्षे विसरणार नाहीत, असा योग्य धडा शिकवू’, असे स्पष्ट केले आहे. ‘मध्य पूर्वेचा सर्व भौगोलिक भाग पालटू’, असेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही राष्ट्राला त्याचे सार्वभौमत्व राखून ठेवण्याचा आणि त्याचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इस्रायलने हमास आणि पॅलेस्टाईन यांच्या विरुद्ध घेतलेला सूड हा इस्रायलचा अधिकार आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रांचा पाठिंबा असलेला इस्रायल ‘या आक्रमणामागे पॅलेस्टाईन आणि इतर आतंकवादी इस्लामी राष्ट्रे आहेत’, असा दावा करत आहे. त्यात काहीही चुकीचे नाही आणि अशा आतंकवादी राष्ट्राची मालमत्ता अन् जीवित यांची हानी झाली; म्हणून याविषयी कुणीही अश्रू ढाळू नयेत.
३. इस्लामेतर राष्ट्रांविषयी द्वेष आणि जिहादला खुला पाठिंबा !
इस्रायलच्या प्रसंगातून आम्हाला (भारतियांना) बरेच काही शिकता येईल. इस्रायल या छोट्या देशाला सर्व बाजूंनी जिहादी आणि इस्लामी राष्ट्रे यांनी वेढलेले आहे. यांपैकी काही राष्ट्रे वगळता इतर राष्ट्रांना इस्लामेतर राष्ट्रांविषयी द्वेष आहे. अगदी अलीकडचा इतिहास लक्षात घेतला, तर हा निष्कर्ष सिद्ध होतो. ओसामा बिन लादेन याला आश्रय देणार्या पाकिस्तानने ‘हा (ओसामा) आतंकवादी पाकिस्तानमध्ये नाही’, असे खोटे अमेरिकेच्या सैन्याने पाकमध्ये जाऊन ठार करीपर्यंत जगाला सतत सांगितले. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानमधील आतंकवाद चिरडून टाकण्यासाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलर्सचे साहाय्य घेऊन त्याचा उपयोग आतंकवादी गटांना साहाय्य करण्यासाठी केला.
४. मुसलमानांविषयी दुटप्पीपणा, तर मुसलमानेतरांविषयी द्वेष अन् अपमान !
थोडक्यात जिहादी राष्ट्रांवर कधीही विश्वास ठेवू नये, तसेच भारतातील तथाकथित देशभक्त म्हणवणार्यांवर कधीही विश्वास ठेवू नये. या तथाकथित राष्ट्रभक्तांकडून सामाजिक माध्यमांतून कशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत, ते आपण पहात आहोत. ‘गोध्रा प्रकरणात गुन्हेगार असलेले जिहादी हे फसले आहेत’, असे ते भासवत आहेत. अगदी तसेच ‘इस्रायलविषयी क्रूर कृत्ये करणारा हमास हा फसला आहे’, असे चित्र त्यांच्याकडून रंगवले जात आहे. हमासकडून करण्यात आलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांविषयी त्यांच्याकडून कोणतीही सहानभूती दाखवली जात नाही.
या सर्व गोष्टींचे तात्पर्य हे की, गुन्हे करणारा मुसलमान हा त्याने कितीही गुन्हे केले, तरी तो निष्पाप ठरतो आणि त्याला इतर मुसलमानांकडून पूर्णपणे पाठिंबा अन् सहानुभूती मिळते. याउलट मुसलमानेतर हा त्याला मृत्यू जरी आला, तरी कधीच खरा नसतो. त्यामुळे तो त्याच्या जीवनामध्ये केवळ द्वेष आणि अपमान नव्हे, तर क्रूर आक्रमणे होण्यास पात्र असतो. एवढेच नव्हे, तर इस्रायलमध्ये झालेल्या घटनांमधील चित्रफितीत दाखवल्याप्रमाणे त्याच्या मृतदेहावरही लघुशंका केली जावी, ही त्याची पात्रता असते. हा इतिहास पुन्हा कधी लिहिला जाईल, हे आपण पाहू. लवकरच हिंदु बहुतांश असलेल्या भारताला इस्रायलप्रमाणे अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल !
– अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.