धर्माचरणाची आवड असलेली आणि व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली नागपूर येथील कु. कार्तिकी अश्विन ढाले (वय १२ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. कार्तिकी ढाले ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. कार्तिकी अश्विन ढाले महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२.११.२०२३) |
आश्विन कृष्ण सप्तमी (४.११.२०२३) या दिवशी कु. कार्तिकी अश्विन ढाले हिचा बारावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि साधिका यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. कार्तिकी ढाले हिला बाराव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. सौ. पूनम अश्विन ढाले (कार्तिकीची आई), नागपूर
१ अ. शांत स्वभाव : ‘कु. कार्तिकीच्या शाळेतील मैत्रिणी कार्तिकीला विचारतात, ‘‘तू इतकी शांत कशी राहू शकते ? तुला कधीच राग का येत नाही ?’’ अशा वेळी कार्तिकी केवळ हसते.
१ आ. धर्माचरणाची आवड : कार्तिकी शाळेत जातांना प्रतिदिन कुंकू लावते आणि हातात बांगड्या घालते. ती सांगते, ‘‘मी कुंकू न लावता राहू शकत नाही.’’ तिचे पाहून तिची मैत्रीणही कुंकू लावते आणि हातात बांगड्या घालते.
१ इ. लहान वयातच योग्य-अयोग्य यांची जाण असलेली कु. कार्तिकी ! : कार्तिकी सांगते, ‘‘कुणाचे पैसे ठेवायला नको. ज्याला पैसे द्यायचे आहेत, ते प्रामाणिकपणे त्यांना द्यावेत. त्यांच्या कष्टाचे पैसे असतात. त्याविषयी खोटेपणा करायला नको. आपल्यावर जर कुणी विश्वास ठेवला, तर आपण त्यांचा विश्वासघात करायला नको.’’ ‘ती समंजसपणे बोलत आहे’, हे पाहून मला कृतज्ञता वाटली. ती या वयातही योग्य-अयोग्य यांविषयी सहजतेने सांगते.
१ ई. कार्तिकीच्या नृत्यशिक्षिकेने कार्तिकीचे केलेले कौतुक : एकदा कार्तिकीच्या कथ्थक नृत्यशिक्षिकेने मला सांगितले, ‘‘कार्तिकी अन्य मुलांपेक्षा वेगळी आहे. तिच्याकडे पाहिल्यावर सात्त्विकता जाणवते. तिची आकलनक्षमता पुष्कळ चांगली आहे. ती हुशार आणि नम्र आहे. ती पुष्कळ पुढे जाऊ शकते.’’
१ उ. व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे आणि गांभीर्याने करणे : ती बसमधून शाळेत जातांना नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि भावजागृतीचे प्रयत्न करते. ती शाळेत असतांना प्रत्येक घंट्यानंतर प्रार्थना करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, गुरुस्मरण करणे, कृतीला भाव जोडणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे, असे शक्य होईल तेव्हा करते. ती शाळेतून घरी आल्यावरही असे प्रयत्न करते. ती साधनेचा आढावा नियमित देण्याचा प्रयत्न करते.
१ ऊ. खाऊसाठी मिळालेले पैसे गुरुचरणी अर्पण करण्याची इच्छा असणे : कार्तिकीच्या मावशीने (सौ. नेहा मुंदडा यांनी) तिला राखीची ओवाळणी दिली आणि तिला सांगितले, ‘‘तुला जी वस्तू हवी असेल, ती तू विकत घे.’’ त्या दिवशी रात्री कार्तिकी मला म्हणाली, ‘‘माझा बास्केटबॉल खराब झाला आहे. तो मला बाबा घेऊन देणार आहेत. आपण मावशीने दिलेले एक सहस्र रुपये गुरुचरणी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी) अर्पण करू.’’ तिचे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. तिला कधीही कुणी पैसे दिले, तर ती ते पैसे एका पेटीमध्ये जमा करते आणि सांगते, ‘‘मी हे सगळे पैसे अर्पण देण्यासाठी जमा करते.’’
१ ए. जाणवलेले पालट : पूर्वी कार्तिकीला तिची चूक सांगितल्यावर तिला चूक स्वीकारायला वेळ लागत असे; पण आता ती लगेच चूक स्वीकारते आणि क्षमायाचनाही करते. ‘तिने अंतर्मनापासून चूक स्वीकारली आहे’, याची मला जाणीव होते. कार्तिकीचा प्रसंगामध्ये न्यूनता घेण्याचा भाग पूर्वीपेक्षा वाढला आहे. पूर्वीपेक्षा तिच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ झाली आहे. तिच्यात गांभीर्य निर्माण झाले आहे.
२. सौ. प्रांजली ब्रह्मे, नागपूर
२ अ. जिज्ञासू वृत्ती : ‘कार्तिकीला एखादे सूत्र समजले नसल्यास ती त्याविषयी पुन्हा विचारून आणि समजून घेते.
२ आ. तत्परता : तिची प्रत्येक गोष्ट तत्परतेने करण्याची सिद्धता असते.
२ इ. प्रांजळ : ती तिच्याकडून झालेली चूक मनापासून स्वीकारते.
२ ई. कार्तिकी बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात भाववृद्धीचा प्रयोग सांगते, तेव्हा त्या प्रसंगात सर्वांना भावस्थिती अनुभवता येते. सर्वांना पुष्कळ आनंद मिळतो.
२ उ. स्वतःत पालट करण्याची तळमळ : तिला तिच्या चुका आणि तिच्याकडून झालेल्या योग्य किंवा अयोग्य कृतींची जाणीव असते. तिची अयोग्य कृती सुधारण्याची सिद्धता असते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.१०.२०२३)
पू. अशोक पात्रीकर यांना जाणवलेली कु. कार्तिकी ढाले हिची गुणवैशिष्ट्ये !‘एकदा मी नागपूर येथे साधकांचा सत्संग घेण्यासाठी गेलो होतो. कु. कार्तिकी सत्संग चालू होण्यापूर्वी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ‘‘माझ्या काही स्वभावदोषांत वाढ झाली आहे. त्यामुळे माझी आणि आईची चिडचिड होते. मला स्वयंसूचना बनवून द्याल का ?’’ मी तिला स्वयंसूचना बनवून दिल्यावर तिने त्या वाचल्या आणि मला म्हणाली, ‘आता माझे स्वभावदोष जातील.’’ तेव्हा मला तिचे पुष्कळ कौतुक वाटले. मी नागपूर येथे आल्यावर ‘तिच्या घरी निवास करावा’, असे तिला वाटते. मी तिला सांगितले, ‘‘मी वेगवेगळ्या साधकांकडे राहिलो, तर त्यांना तुझ्यासारखाच आनंद होतो.’’ तेव्हा तिला ते लगेच पटले. तिच्या शाळेला सुटी असल्यास ती सत्संगात आवर्जून येते.’ – (पू.) अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था (१४.१०.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |