जर्मनीत हमासच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यावर बंदी
बर्लिन – इस्रायलचा नाश करणे, हा हमासचा उद्देश आहे. त्यामुळे हमासच्या समर्थनार्थ जर्मनीत मोर्चे काढणे, तसेच अन्य कृत्ये करणे, यांवर बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेगर यांनी केली.
जर्मनी हमासला आतंकवादी संघटना मानत असल्याने जर्मनीने हमासचे समर्थन करणारे गट विसर्जित करण्याचाही आदेश दिला आहे. जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी १२ ऑक्टोबर या दिवशी या आतंकवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करण्याची घोषणा केली होती.
संपादकीय भूमिकाभारतात अशी बंदी का घातली जात नाही ? |