ज्ञानवापीच्या संदर्भातील मुसलमान पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रीतीकरण दिवाकर यांनी ज्ञानवापीचे प्रकरण अन्य न्यायमूर्तींच्या पिठाकडून स्वतःच्या पिठाकडे स्थलांतरित करण्याचा आदेश रहित करण्यास नकार दिला. अंजुमन इंतेजेमिया मस्जिद कमेटीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती.