Hang The Rapist कुंकळ्ळी (गोवा) येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार
संशयित संतोष सुतार याला अटक
मडगाव, २ नोव्हेंबर (वार्ता.) : कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचे तातडीने अन्वेषण करून पोलिसांनी संशयित संतोष कुमार (वय ३० वर्षे) याला कळंगुट येथून कह्यात घेतले आणि पीडित मुलीची सुटका केली. ३० ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली होती.
संशयिताच्या विरोधात भा.दं. संहितेचे कलम ३६३ आणि गोवा बाल कायद्याचे कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. संशयित संतोष सुतार याला अधिक अन्वेषणासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटना समाजाची खालावलेली नीतीमत्ता आणि युवतींची असुरक्षितता दर्शवतात ! |