खड्डे बुजवले जात नसल्याने मालोडी टोलनाका फोडला !
भिवंडी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी १ नोव्हेंबर या दिवशी मालोडी टोलनाका फोडला. ‘अंजुरफाटा ते चिंचोटी रस्त्यावर प्रचंड खड्डे असून ते खड्डे बुजवल्यानंतर टोल वसुली करावी’, असे सांगूनही टोल वसुली करण्यात येते. याच्या निषेधार्थ हा प्रकार करण्यात आला.
खारबाव गावचे माजी सरपंच महेंद्र पाटील आणि पाये गावचे उपसरपंच प्रशांत म्हात्रे यांनी बॅट घेऊन टोलनाका फोडला.